शाळा सिद्दी पोर्टलला रजिस्टर कशी करावी

*सर्व आदरणिय गुरुजनांना सप्रेम नमस्कार.👏🏻*
आपण मागील दोन दिवसांपासुन *शाळा सिद्भी* संदर्भातील पुस्तिका व ईतर उपलब्ध साहित्याचे वाचन करुन नोंदणीपुर्व तयारी केली त्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन.💐
*आज आपण प्रत्यक्ष न्युपा म्हणजेच NUEPA - NATIONAL UNIVERSITY OF EDUCATIONAL PLANNING AND ADMINISTRATION* च्या वेबसाईटवर जाउन नोंदणी करण्याची प्रक्रिया करणार आहोत. *1)www shaalasiddhi nuepa.org वर जा.*
*2) तेथे प्रथम shaalasiddhi अशा result वर क्लिक करावे.*
*3)आता स्क्रीन वर प्रथम होम व शेवटी login अशी आडवी टॅब दिसतात. तर आता login बटणावर क्लिक करा.*
*4)समोर 7 रंगाची 7 क्षेत्र दिसतात. तेथे आताच काही करू नका.*
*5)login वर username च्या जागी शाळेचा udise नंबर टाकून पासवर्ड नवीन घालायचे आहे. या करिता तेथेच खाली New user वर क्लिक करा.*
*6)समोर creat user दिसेल. step 1 new user details दिसते.*
*7)select user मध्ये school user निवडावे. खाली युडायस नंबर टाकावा. आता मुख्याध्यापक यांचे नाव व मोबाइल नंबर हा संगणक हाताळणारे शिक्षक किंवा शिक्षकेतर यांचा टाकावा. कारण one time password या क्रमांकावर मिळणार आहे. आता त्याखालील generate pin(otp) वर क्लिक करा.*
*8)आता step 2 create password ही टॅब दिसते. तेथे सूचनेप्रमाणे कार्यवाही करा. डाव्या बाजूला दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून तशी कार्यवाही करा*
*9) आपण आता मोबाइलवर आलेला otp टाकून login झालात*
*10)आता यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार डाव्या बाजूच्या home, manage user request ला न जाता evaluation start खाली दिलेल्या Learners, teachers, school evaluation composite matrix, मधील 7 क्षेत्रांची स्वयंमुल्यमापन स्टेपनुसार भरावे. Action for continues school improvement plan मध्ये शाब्दिक माहिती भरावी. व submit करावी.*
*11) reports टॅबवर क्लिक करून सर्व reports मिळतात त्याची प्रिंट काढून घ्या.*
*आपल्या सर्व शाळांना शाळासिध्दी यशस्वीतेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.*

Post a Comment

0 Comments